Quantcast
Channel: EenaduIndia | करिअर
Viewing all 96 articles
Browse latest View live

खूशखबर ! बँक ऑफ बडोदात अधिकारी पदासाठी ४२७ जागा

$
0
0
तुम्ही जर सरळसेवा किंवा स्पर्धा परिक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी देशभरात ४२७ जागा आहेत. १४ नोव्हेंबरपासून यासाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तर याची अंतिम मुदत ५ डिसेंबर आहे.

भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी

$
0
0
सैन्य दलात भरतीची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर आहे. कारण, भारतीय सैन्य दलात रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

कामात यशस्वी होण्याचा 'कानमंत्र'

$
0
0
काम करताना आपल्या आयुष्यात खूप सारे चढउतार येतात. त्यानुसार आपल्याला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. पण काही निर्णय तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. असे निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण असे निर्णय चुकल्याने तुमच्या आत्तापर्यंतच्या कामावर पाणी फिरू शकते. म्हणूनच काहीही करण्याआधी 'या' गोष्टीचा विचार करणे खूप महत्वाचे आहे.

मैत्रीच्या कक्षा रुंदावताना या गोष्टी टाळायला हव्या

$
0
0
कॉन्फरन्समध्ये धाडसाने, सहज आणि आत्मविश्वासाने कसे बोलावे, याविषयावर आधारित अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. याचा वापर तुम्ही करतही असाल. चांगल्या संवादामुळे नवीन मित्र बनतात. मात्र यासाठी नेमका संवाद कसा साधावा, याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. जाणून घ्या मैत्री वाढवण्यासाठी टिप्स.

कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) तीन हजारपेक्षा अधिक पदांसाठी भरती

$
0
0
कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्यूनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी इच्छुक व योग्य उमेदवार १८ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जासंबंधी माहिती खाली दिलेली आहे.

आपल्या भाषणात इवांका ट्रम्पने का केली या 'तिघींची' स्तुती ?

$
0
0
इवांका ट्रम्पच्या भारत आगमनानंतर संपूर्ण देशाचे लक्ष इवांकाकडे वेधलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत काल मंगळवारपासून सुरू झालेल्या जागतिक उद्योगिकता परिषदेत भाषण देताना इवांका ट्रम्पने तीन उद्योजिका महिलांचा खास उल्लेख केला. या तीन महिला कोण ? त्यांनी असे काय केले की, इवांकाला आपल्या भाषणातून त्यांच्या कार्याची दखल घ्यावीशी वाटली ?

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : या आयआयटींना मिळणार २००० कोटींचे व्याजमुक्त कर्ज

$
0
0
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी सहा संस्थांना सरकारतर्फे २,००० कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

बॉसच्या नम्र स्वभावामुळे वाढते टीममधील सृजनशीलता

$
0
0
संस्थेतील बॉसचा स्वभाव नम्र असेल तर त्या संस्थेचील सदस्य अधिक सृजनशीलतेने काम करतात, असे एका संशोधनात आढळले आहे. अमेरिकेतील ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीच्या फिशर कॉलेज ऑफ बिझनेसच्या सहाय्यक प्राध्यापक जिया हू यांच्या मते, जेव्हा एखाद्या टीममधील सदस्य व टीम लीडर यांच्यामध्ये मोकळा संवाद घडत असेल, तर असा नेता अधिक प्रभावी ठरतो.

अशा रस्त्यांमुळे कमी होतात अपघात

$
0
0
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आपण आपल्या वाहनाचा वेग कमी करतो, वाहतुकीच्या नियमांचे पालन करतो. असे करूनही अनेकदा अपघात घडतात. परंतु आता संशोधकांनी असे तंत्र शोधून काढले आहे, ज्यामुळे वाहन वेगात चालवूनही तुम्ही अपघात टाळू शकता.

करिअरमध्ये प्रगतीसाठी ही पाच कौशल्ये शिका

$
0
0
जे शिक्षणाची दारे बंद करून घेतात त्यांची प्रगती थांबते. इतरांपेक्षा वेगळे ठरायचे असेल तर तुम्हाला नवीन गोष्टी शिकणे व स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहायला हव्या.

पुस्तकांना बनवा आपला बेस्ट फ्रेंड

$
0
0
पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही, वाचाल तर वाचाल असे बरेच म्हटले जाते. परंतु पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही, करिअर व घरातील कामामुळे पुस्तक वाचणे बंद झाले आहे, अशी अनेकांची तक्रार असते. यामुळे पुस्तकांना आपले मित्र बनवणे कठीण काम ठरते.

अशाप्रकारे निवडा प्रोफेशनल शूज

$
0
0
तज्ज्ञांच्या मते वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे जोडे घालायला आवडतात. डान्सर्सना डबल माँक स्टाईलचे जोडे अधिक आवडतात तर गिटारिस्ट डर्बी स्टाईलचे जोडे घालतात. आपल्या पेहरावासोबतच चांगले फुटवेअर घालण्याची आवड प्रत्येकाला असते.

ऑफिसमध्ये स्त्रियांना अधिक डावलले जाते

$
0
0
तुम्हाला आपल्या ऑफिसमध्ये कोणत्याही नवीन कामासाठी आपल्या संकल्पना पुढे मांडायला आवडते का ? जर तुम्ही स्त्री आहात तर सावध व्हा, तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी तुम्हाला तुमच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा कमी श्रेय दिले जाण्याची शक्यता आहे. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. जेव्हा एखाद्या टीममध्ये लीडर निवडायची वेळ येते तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांना अधिक महत्व दिले जाते.

करिअरच्या नव्या वाटांमध्ये निवडा फॅशन ब्लॉगर बनण्याचा पर्याय

$
0
0
फॅशन हे असे क्षेत्र आहे ज्याच्या झगमगाटामुळे सगळेच आकर्षित होतात. परंतु या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणे तितकेच कठीण काम आहे. स्पर्धेचा सामना करत काही लोक या क्षेत्रात यश मिळवतात तर काहींच्या हाती निराशा लागते. जर तुम्हीही या क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असाल तर फॅशन ब्लॉगर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

सध्या चर्चेत असलेल्या 'रॉ' या गुप्तचर संस्थेसाठी कसे दिले जाते प्रशिक्षण ?

$
0
0
पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याविषयीच्या बातम्यांमुळे सध्या भारतीय रिसर्च अॅन्ड अॅनलिसिस विंग (रॉ) ही गुप्तचर संस्था चर्चेत आहे. कुलभूषण हे रॉ एजंट असून त्यांनी पाकिस्तानात दहशतवादी कार्य केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. कुलभूषण रॉचे एजंट असल्याचा दावा भारताने फेटाळला असला, तरी या प्रकरणामुळे रॉ ही संस्था चर्चेचा विषय बनली आहे.

करिअरमध्ये प्रगतीसाठी ही पाच कौशल्ये शिका

$
0
0
आपल्या करिअरच्या घोडदौडीत इतरांपेक्षा वेगळे ठरायचे असेल तर तुम्हाला नवीन गोष्टी शिकणे व स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. जे शिकण्याची दारे बंद करून घेतात त्यांची प्रगती खुंटते. त्यामुळे आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहायला हव्या.

आई होणाऱ्या स्त्रियांसाठी करिअरची वाट ठरते कठीण

$
0
0
मूल झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी परत रुजू झाल्यावर महिलांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. बाळंतपणाच्या रजेनंतर नव्याने रुजू झालेल्या दहा पैकी सहा आयांना त्यांच्या करिअरच्या संधी कमी झाल्याचे दिसून आले.

आता 'नारी' वर मिळेल महिलाविषयक योजनांची माहिती

$
0
0
महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे मंगळवारी नवीन वेब प्लॅटफॉर्म 'नारी' चे उद्घाटन करण्यात आले. महिलांशी निगडीत सर्व शासकीय योजनांची माहिती या पोर्टलवर सहज उपलब्ध करून देण्यात येईल.

इग्नूमध्ये प्रवेश घ्यायचाय ? मग ३१ जानेवारीपूर्वी करा अर्ज

$
0
0
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) जानेवारी २०१८ सत्रासाठी प्रवेशपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याद्वारे इग्नूच्या २०० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांच्या जानेवारी सत्रासाठी थेट प्रवेश अर्ज करता येईल.

सहकाऱ्याच्या राजीनाम्यानंतर तुम्ही काय कराल ?

$
0
0
आपल्या व्यावसायिक आयुष्यात सहकाऱ्यांची साथ फार महत्वाची असते. आपले काम व सामाजिक संवाद या दोन्हींमध्ये सहकाऱ्यांची सोबत मदतीची ठरते. परंतु कधीतरी तुम्हाला वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे सहकाऱ्यांपासून दूर व्हावे लागते. ही अचानक झालेली विभागणी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
Viewing all 96 articles
Browse latest View live




Latest Images